

अमन,शांती आणि बंधूभाव व मानव कल्याणासाठी मुस्लिम बांधवाकडुन अल्लाकडे केली प्रार्थना…
रमजान ईद निमित्त इदगाह परिसरात राजकिय,सामाजिक कार्यकर्त्यांनी मूस्लीम बांधवाना इदच्या दिल्या शुभेच्छा.
मानव कल्याणासाठीची प्रार्थणा अल्लाकडे
उदगीर प्रतिनिधी : पवित्र रमजान महिन्याच्या ईद उल फिञ ची नमाज उदगीर येथिल ईदगाह मैदानावर पठण करण्यात आली या प्रार्थनेत जगात अमन शांती व बंधुभाव नांदावा व मानव कल्याणासाठी मुस्लीम बांधवानी अल्ला ईश्वराकडे प्रार्थना केली.यावेळची नमाज मौलाना मुफ्ती सय्यद मुश्ताक अहमद खतीब यांच्याकडून नमाज पठण व खुतबा दिला त्यानंतर बयान मौलाना मुफ्ती हम्माद कुरैशी यानी केला. ईदगाह मैदानावर मोठयाप्रमाणात मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली.मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकिय नेते,संघटनेचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,प्रशानातिल अधिकारी उपस्थित होते यानी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छाा दिल्या. उपवास करुन नमाज पठन केले जाते. या पवित्र महिन्यात मुस्लीम बांधव हे मानवाच्या कल्याणासाठी अजान पठन करुन अल्हाकडे प्रार्थना करतात. विश्व शांतीसाठी मुस्लीम बांधवाकडुन नमाज पठन करुन मानव कल्याणासाठी प्रार्थना केली उदगीर शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लीम समाज बांधवांच्या ‘ईद-उल-फित्र’ कार्यक्रमास मोठयाप्रमाणावर मूस्लीम बांधव ऊपस्थित होते.
यावेळी इदगाह येथे मौलाना मुफ्ती सय्यद मुश्ताक अहमद खतीब यांनी नमाज़ आणी खुतबा दिला.बयान मौलाना मुफ्ती हम्माद कुरैशी
यांनी केले.
यावेळी ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.